top of page
Writer's pictureNiilesh Llimaye

राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेस चे व्यंजन रुचिर

The author's own creative description of the cuisine served at the Grand Coronation ceremony of Chhtrapati Shivaji Maharaj marking the completion of 350 years.




IMAGES OF THE RAIGAD FORT WHERE THE CORONATION WAS HELD



CHHTRAPATI SHIVAJI MAHARAJ


स्वराज्य स्थापने च्या  दृष्टीने राज्याभिषेक सोहळा हा अक्ख्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाचा सुवर्ण महोत्सव. राम अयोध्येला पराक्रमी होऊन परतले त्या वेळेस जशी अयोध्या सजली धजली होती, रांगोळ्या काढल्या जात होत्या,  पंचारत्या ओवाळले जात होते त्याच भक्ती भावाने आज:अमृताहुनी गोड  असा दिन रायगडावर साजरा होत होता,


आपले  राजे खऱ्या  अर्थाने रयतेचे छत्रपती होणार  होते अश्या समारंभाची जय्यत तयारी अर्थात वर्षा आधी पासून सुरु झाली असणार . जसजसा तो दिवस जवळ  येऊ लागला महिने उलटू लागले आणि साधारण महिना डीड महिन्या आधी लोकांची, पाहुण्यांची आगमनाची तयारी ला जोर पकडू लागला असणार. आता एवढा मोठा

कार्यक्रमाचा नियोजन कर्ण सहज सहजी च  काम नाही, त्यात शिवरायांचा राज्य गौरवाचा समारंभ तेव्हा ह्याचे नियोजन शिस्तबद्ध झाले असणार यात काहीच  शंका  नाही.


अश्या समारंभाच्या  केंद्र स्थानी  असणार त्याचे अतिथींचं स्वागत कक्ष,त्यांच्या राहण्या आणि अगत्याची पूर्व  तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समस्त पाहुण्यांची उदर्भरणाची.


जिथे आपल्या  संस्कृतीत नुसतं  पोट भरून चालणार नाही तर भोजन ग्रहण  करणे  म्हणजे महत्वाचे यज्ञकर्म असा आपण म्हणतो तिथे आलेल्या रयतेचे, विशिष्ट पाहुण्यांचे, अतिथी बांधवांचे, वेग वेगळ्या प्रांतातल्या राजे  महारजायचें, त्यांच्या सेवकांचे, त्यांनी  आणलेल्या घोड्यांचे, प्राणी  मात्र्यांचे, पायथ्या ला वसलेल्या गावातल्या लोकांचे, खुद्द रायगडावर स्थायिक जनतेचे, सेवकांचे, मानाच्या  वेद अभ्यासकांचे , पंडिताच्या कलाकुसरीने, आलेल्या कलाकारांच्या आवडी   नुसार असा आणि अजून कित्येक प्रकारच्या व्यंजनाची, त्यांच्या भोजनाची , वेळेनुसार प्रपंचाची  सोय आणि त्याचे   नियोजन करावे  लागले असणार. कारण इथे  प्रतिमा  हिंदवी स्वराज्याचा स्वप्न  पाहणाऱ्या राजाच्या दरबारी  आलेल्या अतिथींचे तर होतीच  पण त्या ही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे असा क्षण,  सोहळा हा अनेक  शतके  १००० वर्ष आपल्या देशवासीयांनी काळा च्या ओघात शतकानुशतके ना अनुभवणारा, ना भासणारा कधी ना झालेला असा हा सोहळा  त्या किल्ल्यावर, मातीच्या पठारावर, स्वराज्याच्या राजधानीत, सह्याद्रीच्या कुशीत ना भूतो पण भविष्यात  त्याची सर , त्या समारंभाचे परिपाकव्व्ह असे माणकीकरण होईल असा थाट  तिथे मांडायचा  होता.


रायगडावर ह्या सोहळ्यात दुश्मन असला तरी तो  अतिथी  म्हणून  येणार होता, या सोहळ्यात पहिल्यांदा परोपकाराची भावना लक्षात  ठेवून  प्रत्येकाचं स्वागतच होणार होतं तेव्हा रायगडावर पायथ्या पासून प्रत्येक प्रवासी, पाहुण्याची स्वागताची तयारी चा नियोजन केलं गेलं असणार. भर रणरणत्या उन्हात येणारे सेवक, प्रवासी रायगड  चढून येतील तेव्हा त्यांना  तहान लागेल म्हणून  काही अंतरावर पाणपोळ्यांची सोय, उन्हाच्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून वृक्षांच्या सावलीचा योग्य  प्रयोग करून गड चढताना  पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्या सह मातीच्याकुंडातील वाळा युक्त जल पिऊन  घटका दोन घटके थांबबून सह्याद्रीत   वसलेल्या त्या नैसर्गिक भूप्रदेश्याच्या परिसराची नजर डोळ्यात  सामावून पाहता पाहता तो  सुखद वारा पाहुण्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्या नक्कीच  देऊन जात असेल. त्याच वाटेवर स्थानिक

चाकरमानी आपल्या घड्यात थंडगार ताकाचा पेला पाहुण्यांना विसाव्या साठी देत  असतील  आणि त्याबरोबर दूधपाक किंवा डाळीची भजी आणि बासुंदी असा बेत पाहुण्यांना ताजतवानं  करायला  वाढणारे सज्ज असतील.


आता ही झाली  पाहूणांची सोय पण त्यांच्या घोड्यां साठी किंवा गाईं- गुरांसाठी देखील  पाण्याची टाकी, चाऱ्याची सोय केलेली असणार. म्हणजे गडावर पोचस्तवर   पाहुण्यांना कुठला ही त्रास होणार नाही याची  खबरदारी केलेली असणार.


  गडावर पोचलं  म्हणजे मग पंचपक्वान्नांची रेल चेल सुरु.

राज्याभिषेका  वेळची   व्यंजन सूची समजण्या आधी आपण त्यावेळच्या रायगडाच्या आसपासच्या . भूप्रदेशाची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच याची तयारी मार्च-एप्रिल (म्हणजेच  चैत्र-वैशाखा पासून सुरु झाली असेल. म्हणजेच तेव्हा अति उष्णतेचे दिवस, पाण्याची टंचाई, तापत्या उन्हाची रखरख आणि ऐन ज्येष्ठ  महिन्यात राज्याभिषेक म्हणजेच पावसाच्या आगमनाची चाहूल लागलेली असणार.

आंबे, करवंद, जांभूळ, फणस अश्या रान फळांचा आणि कोकणमेव्याचा आस्वाद दरवळत असणार. महाराजांना खुद्द आंबे आवडायचे असा उल्लेख आहे तेव्हा आमरस आणि आंबा पोळी, घावन, आंब्याचे किंवा फणसाचे सांदण, आंब्याची आमटी किंवा करवंदाचे  किंवा पेरूचे  कायरस असे प्रकार पंक्तीत असतील.


पारंपरिक उत्सवाचा वातावरण असल्या कारणाने बहुतांश व्यंजन हे शाकाहारी  असू शकेल. तसेच शिवाजी महाराज शाकाहारी होते  तसंच त्यांना खिचडी आवडत असल्याची  माहिती मिळते.  लहानपणी त्यांच्या  आहारात खिरी- पेच असत.


पण म्हणून पाहुण्यांसाठी मात्र विविध प्रकार वाढले गेले असतील.

अर्थात स्वराज्य स्थापनेचा काळ बिकट परिस्थियुतीतून जात होता तेव्हा खुद्द महाराजांना आणि मावळ्यांना मोहिमेत जे मिळेल त्यावर भागवायच पण निष्ठा स्वातंत्र्याचीच ठेवायची याच  भावनेने खाण्यापिण्यात रस नसणार याची जाणीव देखील तितकीच मानली पाहिजे. अर्थात आता स्वराज्याचं  राष्ट्र उभं  राहणार होत आणि मनाची, बुद्धीची तश्याच बलाढ्य सैन्याशी लढण्यासाठी सकस आहार असणं हे देखील महाराज ओळखून  असतील.  म्हणूनच ज्वारी , तांदूळ , मका हे  त्यांचा भटारखान्यात नेहमी असायचं.


महाराष्ट्राची खाद्य संस्कृती  अपरंपार आहे म्हणून काय  तर विविध प्रकार चालत आलेले आहेत.

पुरणपोळी ,  मोदक , दह्यातले   रायते , कटाची   आमटी, उसाच्या रसाच्या दशम्या, वांग्याची भाजी, अंबाडीची चटनी , ओल्या हरभऱ्याची चटनी, बेलफळाचा मुरंबा, ठेचा.

भात मुबलक  असल्या कारणाने विविध. भाताचे प्रकार गोळा भात, गुरगुट्या भात, लापशी,  दही बुत्ती, चित्रान्न , वऱ्याचे तांदूळ, दाण्याची आमटी, कढी चे विविध प्रकार , ज्वारीची आंबील, श्रीखंड कुरडया, वाळवणीतले प्रकार, सांडगे, पिठलं, झुणका, फणसाची  भाजी असे नाना प्रकार त्या वेळेस बनवले  गेले  असतील.


काही मांसाहार्य करणाऱ्या अतिथीं  करिता मटणाचे  प्रकार, मास्यांचे प्रकार, रस्से , सार करण्यात आले असतील.


गोडाधोडा मध्ये खरवस , साबुदाण्याची, शेवयांची, तान्दुळाची  खीर , खांदवे, करंज्या, साटोर्या, गव्हल्याची  खीर, विविध प्रकारचे लाडू, मोरंबा.


मुखशुद्धी करिता पानचूर्ण, पाचक पण असेल.


खरंच का कुठे या उत्सवाच्या वेळेस च्या रुचपालटाची कुठे नोंद नाहीये?


(समस्त लेख हा लेखकाच्या कल्पक्ते नुसार त्यावेळेस प्रचलित आणि पारंपरिक पदार्थ चालत आलेल्या चाली रुढीं पासून वैचारिक रित्या  आणि इतिहासकारांनी केलेल्या संशोधनावरून मांडलेला आहे.

लेखात दिलेल्या  पदार्थांची नावे महाराष्ट्राचा संस्कृतीकोश या महाराष्ट्र राज्य  साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या कोषातून घेतलेली आहेत).

  

Recent Posts

See All

コメント


bottom of page